logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी या आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

4 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
4 hrs ago

टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी या आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    1
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे. या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    1
    पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे.

या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अकोला जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांच्या अंतर्गत मशागतीची म्हणजेच डवरणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. पिकांची योग्य वाढ व्हावी आणि तणाचा बंदोबस्त व्हावा यासाठी शेतकरी सकाळपासूनच शेतात राबत आहेत. पेरणीनंतर रोपे व्यवस्थित उगवून आली असून, ग्रामीण भागात शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने अथवा लहान ट्रॅक्टरच्या मदतीने डवरणीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. या डवरणीमुळे तण साफ होण्यासोबतच मातीची धूप रोखणे आणि पिकांच्या मुळांना हवा खेळती राहण्यास मदत होत आहे. दरम्यान, पेरणीनंतर सुरुवातीचा पाऊस ओसरल्याने आणि हवामानात उकाडा वाढल्याने पिकांच्या जोमदार वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. डवरणीची कामे आटोपत आली असली तरी पावसाने दिलेली उघडीप लांबल्यामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला असून लवकरच दमदार पाऊस कोसळेल अशी तीव्र आशा बाळगून आहे.
    1
    अकोला जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांच्या अंतर्गत मशागतीची म्हणजेच डवरणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. पिकांची योग्य वाढ व्हावी आणि तणाचा बंदोबस्त व्हावा यासाठी शेतकरी सकाळपासूनच शेतात राबत आहेत. पेरणीनंतर रोपे व्यवस्थित उगवून आली असून, ग्रामीण भागात शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने अथवा लहान ट्रॅक्टरच्या मदतीने डवरणीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. या डवरणीमुळे तण साफ होण्यासोबतच मातीची धूप रोखणे आणि पिकांच्या मुळांना हवा खेळती राहण्यास मदत होत आहे.

दरम्यान, पेरणीनंतर सुरुवातीचा पाऊस ओसरल्याने आणि हवामानात उकाडा वाढल्याने पिकांच्या जोमदार वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. डवरणीची कामे आटोपत आली असली तरी पावसाने दिलेली उघडीप लांबल्यामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बळीराजा आता आकाशाकडे डोळे लावून बसला असून लवकरच दमदार पाऊस कोसळेल अशी तीव्र आशा बाळगून आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शेगाव येथील एन.व्ही. चिन्मयानंद विद्यालयात रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ, सोशल मीडियावरील दिशाभूल आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याविरोधात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे "व्यसनाला नाही, सुरक्षित भविष्यास होकार" असा ठाम संदेश देत विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाढते तस्करीचे जाळे आणि त्यामध्ये अडकलेल्या तरुणांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अवैध ड्रग्ज व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक बळ मिळत असल्याने हा विषय राष्ट्रीय सुरेशेशी जोडलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सोबतच OTP, बँकिंग माहिती, फिशिंग लिंक, QR कोड फसवणूक, बनावट मोबाईल अॅप्स, ऑनलाईन गेमिंग स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल अटक (Digital Arrest) आणि AI आधारित डीपफेक यांसारख्या नव्या सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यासाठी १९३०, तस्करीच्या संशयास्पद हालचालींसाठी १९३३ आणि व्यसनमुक्तीसाठी १४४४६ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव आणि पोलीस शिपाई ऋषिकेश जवळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, हेमलता मॅडम, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि राष्ट्रहित जपणाऱ्या जबाबदार नागरिक होण्याचा निर्धार व्यक्त केला असून रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    शेगाव येथील एन.व्ही. चिन्मयानंद विद्यालयात रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ, सोशल मीडियावरील दिशाभूल आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याविरोधात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे "व्यसनाला नाही, सुरक्षित भविष्यास होकार" असा ठाम संदेश देत विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाढते तस्करीचे जाळे आणि त्यामध्ये अडकलेल्या तरुणांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अवैध ड्रग्ज व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक बळ मिळत असल्याने हा विषय राष्ट्रीय सुरेशेशी जोडलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सोबतच OTP, बँकिंग माहिती, फिशिंग लिंक, QR कोड फसवणूक, बनावट मोबाईल अॅप्स, ऑनलाईन गेमिंग स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल अटक (Digital Arrest) आणि AI आधारित डीपफेक यांसारख्या नव्या सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यासाठी १९३०, तस्करीच्या संशयास्पद हालचालींसाठी १९३३ आणि व्यसनमुक्तीसाठी १४४४६ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव आणि पोलीस शिपाई ऋषिकेश जवळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, हेमलता मॅडम, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि राष्ट्रहित जपणाऱ्या जबाबदार नागरिक होण्याचा निर्धार व्यक्त केला असून रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    2 hrs ago
  • पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    1
    पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले.

या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.
    1
    दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अमरावतीच्या बडनेरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    अमरावतीच्या बडनेरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    1
    वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
    1
    अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.