धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालणार? ; नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा; प्रशासनाच्या कारवाईकडे अहिल्यानगरचे लक्ष अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसेच ओपन स्पेसवर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. *नोटिसीत नेमकं काय?* नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचे नोटिसीत नमूद आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २३७४ व २५१७ संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांना आपले म्हणणे आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. *आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी* धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तीनही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. *आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?* धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने प्रशासनाने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगाने पुढे जाते, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.

- "...तर सडक्या आंब्यांना सोडणार नाही" Nitesh Rane यांचा रोख कुणाकडे? पाहा काय म्हणाले... प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन मंत्री नितेश राणे आक्रमक झालेत.मराठा मुलांवर अन्याय झाल्यास जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी दिलाय...सडक्या आंब्यांना सोडणार नाही असंही ते म्हणालेत.1
- “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील “मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी”— डॉ. संजयराव तायडे पाटील छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांचा आम्ही नेहमीच आदर केला असून, मराठा समाजाला दिशा देणारे ते मोठे नेतृत्व आहे. मात्र, कोणाकडूनही मिळालेल्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज करून घेण्याऐवजी संबंधित घटनेची वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी केले आहे. डॉ. तायडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या बैठकीबाबत मा. ना. एकनाथराव शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बैठक घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्या बैठकीचा एकनाथराव शिंदे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. संबंधित दिवशी रविवार असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी होती. शहरात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करणाऱ्या काही जुन्या सहकाऱ्यांची बैठक जवळच्या शिवछत्रपती कॉलेजच्या सभागृहात नियोजित होती. मात्र, तेथे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेची जागा एक-दोन तास चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. बैठकीतील अनेक जण संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक असल्यामुळे त्यांची विनंती मान्य करण्यात आली. यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. “या संपूर्ण घटनाक्रमात एकनाथराव शिंदे साहेबांचा संबंध कुठेही येत नाही. त्यामुळे दादांनी कोणत्याही माहितीची शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा,” असे डॉ. तायडे पाटील यांनी म्हटले आहे. *मराठा आरक्षणासाठी एकनाथराव शिंदे सरकारने उचललेली ठोस पावले* एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठोस पावले उचलली. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला. या अहवालाच्या आधारे २० फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. हे आरक्षण ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात आले. त्याचप्रमाणे, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून राज्यातील जुन्या महसुली, शैक्षणिक, निजामकालीन आणि इतर शासकीय अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. उपलब्ध नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी आवश्यक सांख्यिकीय माहिती, कायदेशीर पुरावे आणि आयोगाचा सविस्तर अहवाल तयार करण्यावरही शिंदे सरकारने भर दिला. मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. “एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या सरकारने राज्यव्यापी सर्वेक्षण केले, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला, विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रियाही गतिमान केली. त्यामुळे एकनाथराव शिंदे हे मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही,” असे डॉ. तायडे पाटील यांनी नमूद केले. “काही लोक स्वतःच्या वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी चुकीची अथवा अपूर्ण माहिती देत असतील, तर दादांनी त्या माहितीची खात्री करावी. आम्ही मनोजदादांचे विरोधक नाही. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम राहील. गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहोत,” असे डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.1
- जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.1
- ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे... ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर ANC - कॉकरोच जनता पक्षाने बनवलेल्या कार्यकारणीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये CJP च्या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, अभिजीत दिपकेने कॉकरोच जनता पार्टीसाठी बनवलेल्या कार्यकारणी मध्ये मैत्रिणी आणि आम आदमी पक्षाच्या जुन्या लोकांना कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी बनवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, मुळातील आंदोलकांना पदाधिकारी करावे अशी मागणी घेऊन पुकारलेल्या उपोषणा दरम्यान उपोषणाचा चौथा दिवस असताना उपोषणकर्ते पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपोषणकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. अभिजीत दिपकेच्या विरोधामध्ये पुकारलेले संभाजीनगर मधील हे आंदोलन आहे...3
- क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले1
- हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप1
- जात पडताळणी समितीविरोधात कोळी समाजाचा मोर्चा; टाळेठोक आंदोलन मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कथित अन्यायकारक कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेत वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समिती कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.1