logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई हिंगणघाट....वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

10 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
10 hrs ago

वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई हिंगणघाट....वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    1
    सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    28 min ago
  • आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता
कुही जि.नागपुर(शरद शहारे)
कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही.
सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे  अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    19 hrs ago
  • Post by Irshad Alam
    1
    Post by Irshad Alam
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    21 hrs ago
  • Post by Suraj Pawar
    1
    Post by Suraj Pawar
    user_Suraj Pawar
    Suraj Pawar
    यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
    1
    विशेष प्रतिनिधी
मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे.
मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल.
ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे.
शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    46 min ago
  • चंद्रपूर - महाराज प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, शंकरपूर ग्रामपंचायत चे सरपंच साईश वारजूकर यांचा चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितित आज मुंबईत रीतसर केला भाजपात प्रवेश.
    1
    चंद्रपूर - महाराज प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, शंकरपूर ग्रामपंचायत चे सरपंच साईश वारजूकर यांचा चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितित आज मुंबईत रीतसर केला भाजपात प्रवेश.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.