logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

3 hrs ago
user_User2410
User2410
समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
3 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात सतीश भालेराव नागपूर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    2
    सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
सतीश भालेराव नागपूर 
नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    1
    वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन 
वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद
    1
    शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद 
शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    1
    आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    1
    धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप नागपूर/उमरेड: शहरातील गृहिणी ते यशस्वी उद्योजिका! योगिता बारपात्रे यांच्या 'Veru Foods' चे दिमाखात उद्घाटन
    1
    उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप
उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप
नागपूर/उमरेड: शहरातील गृहिणी ते यशस्वी उद्योजिका! योगिता बारपात्रे यांच्या 'Veru Foods' चे दिमाखात उद्घाटन
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    1
    जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी

जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.