नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणीटंचाई नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदुरा पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाण्याची परिस्थिती गंभीर बनत चालली असून, यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या समस्येची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर पुढील काळात आणखी आंदोलनात्मक पावले उचलली जाऊ शकतात, असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे.
नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणीटंचाई नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथे सध्या तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदुरा पंचायत समिती कार्यालयात जाऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाण्याची परिस्थिती गंभीर बनत चालली असून, यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या समस्येची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर पुढील काळात आणखी आंदोलनात्मक पावले उचलली जाऊ शकतात, असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे.
- खामगांव : जन सामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वकांशी योजना सुरू केल्या आहेत, या योजणांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा,त्यांना त्यांचा लाभ द्या आणि जनसंघापासून भाजपाचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास आज 3 मार्च रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ना. अँड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आले त्यावेळी ते भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. जनसंघापासून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. पक्षासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व सतत झटणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. देश सेवेसाठी नेहमी सतत करत असलेले कार्य व जनहितासाठी आपल्या सरकारने आणलेल्या योजना व त्या प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना दिलेला त्यांचा लाभ या लोकांना माहिती असाव्या व ज्या गरजूना लाभ मिळाला नाही अश्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सातत्याने भाजपाच्या वतीने राबविण्याचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत व त्या प्रभावीपणे राबविले सुद्धा जात आहेत. परंतु अजूनही अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची काहीच माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब प्रत्येक नागरिकाला या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची मदत करा जेणेकरून आपल्याला सुद्धा पुण्य लाभेल व गरजू व्यक्तींचे सुद्धा आयुष्य उज्वल होईल. प्रधानमंत्री आवास योजना, पी एम किसान योजना,कौशल्य विकास योजना,जलजीवन योजना अशा शेकडो अनेक योजना मार्फत शेतकरी व इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी,नोकरदार असो वा इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी कोणती न कोणती चांगल्या लाभाची योजना सरकारने आणलेल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा आरोग्य संबंधितही योजनेमार्फत कोट्यावधी रुग्णांना याचा लाभ होत आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आपण महामारीवर मात केली. देशातील करोडो नागरिकांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना आपण व्हॅक्सिन देऊन जीवनदान दिले व मानवता जोपसली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली त्या अंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते आजही देणे सुरू आहे. असे अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करत आहे याची माहिती प्रचार व प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा जेणेकरून भाजपाचे देशसेवा व समाजसेवा हेच कार्य आहे असे अभिमानाने सांगून पटवून द्या. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिषद भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला मेरा बूथ सबसे मजबूत हा नारा सदैव लक्षात ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा व भारतीय जनता पार्टीचा पक्ष विस्तार आणखी वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा यावेळी ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. या उद्घाटनचा सत्रास भाजपा खामगाव जिल्हा व खामगाव मतदार संघातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या प्रशिक्षण वर्गास आपली (कार्यकर्ता सांभाळणे ) या विषयावर भाजपा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, मन की बात बूथ व्यवस्थापन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, SIR विशेष सखोल निरीक्षण या विषयावर याचे खामगाव प्रमुख तथा भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, कार्य विस्तार आमची दृष्टी खामगाव तालुका सरचिटणीस वैभव डवरे, वैचारिक अधिष्ठान शेखर कुलकर्णी, केंद्र व राज्य सरकार योजना व सरकारची कामगिरी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, इतिहास व विकास ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख, व मीडिया, सोशल मीडिया, AI, नमो ॲप या विषयावर सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.2
- नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था. नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई. दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई. हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.1
- भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरातील नळ योजनेच्या पुरवठ्यात गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्यामुळे कॉलरा, टायफॉइड, काविळ आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार पसरत आहेत. योग्य जलशुद्धीकरण यंत्रणेचा अभाव आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य धोके आणि कारणे: - दूषित पाणी: पिण्याच्या नळांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने माती व लहान जीवजंतू असलेले पाणी पुरवले जात आहे. - आजारांचा प्रादुर्भाव: दूषित पाण्यामुळे नागरिकांना वांत्या, जुलाब, अतिसार व ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय. - जीर्ण पाइपलाइन: अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या पाइपलाइन आणि गटारांच्या पाईप्स जवळील पाईप्समुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. - जलशुद्धीकरणाचा अभाव: अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांची आवाज: - डॉ. परवीन अन्सारी (वार्ड एक महिला):* अलनूर मस्जिद परिसरात मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जुनी पाईपलाईन फुटली असता थातूर मातुर जोडणी केल्याने गटाराचे पाणी नळ योजनेच्या पाण्यात मिसळत आहे. - चित्रा संतोष पवार (नगर अध्यक्ष): नगर पंचायतने पाणी शुद्धतेची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. संबंधित अभियांत्याला सूचना दिली असून दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल व पाणी तपासून घेतले जाईल. नगर पंचायतने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.10
- छत्रपती संभाजीनगर येथील संपादक व पत्रकार रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, दरेकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेबाबत पुराव्यानिशी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. हा गुन्हा खोटा असून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले असून, हा प्रकार दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दरेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच दरेकर यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांनी विविध प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार उघड केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मंठा येथील पत्रकारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.1
- Post by AKBAR SHAHA1
- राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- खामगाव: हॉटेल मालक घरी गेल्याची संधी साधून कार, लॅपटॉप आणि टॅब घेऊन पसार झालेल्या नोकराला शिवाजी नगर पोलिसांनी अत्यंत चातुर्याने अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२, रा. दालफैल, खामगाव) यांचे शहरात हॉटेल व लॉजिंग आहे. त्यांच्याकडे सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. सजनपुरी) हा तरुण नोकर म्हणून कामाला होता. १ एप्रिल २०६ रोजी श्रीकांत देशमुख हे अंघोळीसाठी घरी गेले असता, आरोपी सुनील याने काउंटरवरील मोटोरोला कंपनीचा टॅब, एचपीचा लॅपटॉप आणि मालकाची रेनॉल्ड क्विड कार क्रमांक MH 12 TD 5295 असा एकूण ३,०५,००० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३०५, ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने वेगाने चक्र फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना टोल नाका परिसरात एक मोरपंखी रंगाची कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेऊन पाहणी केली असता, चोरी गेलेली कार आणि त्यामध्ये आरोपी सुनील नेमाणे मिळून आला.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुरी, पोहेकों संदीप टाकसाळ, पोकों केशव झाल्टे, मपोकों पल्लवी बोर्डे, चालक विशाल,पोहेकों राजू आडवे व पोकों कैलास ठोंबरे यांनी केली आहे.1
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1