Shuru
Apke Nagar Ki App…
*Breaking News...* *खापरखेडा* अण्णा मोड येथे जेसीबीने घेतला पेट. *खापरखेडा-कोरडी रोड JCB ने घेतली पेट!फायर ची गाडी घटनास्थळी दाखल.
Jb Y.Sharma
*Breaking News...* *खापरखेडा* अण्णा मोड येथे जेसीबीने घेतला पेट. *खापरखेडा-कोरडी रोड JCB ने घेतली पेट!फायर ची गाडी घटनास्थळी दाखल.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.1
- Post by Ramrao Gaurkhede1
- मध्यरात्री पाणी टँकर विक्रीचा धक्कादायक आरोप – वानाडोंगरीत खळबळ! नागपूर :- वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे. सामाजिक कार्यकर्ते रोशन गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला की रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान नगरपरिषदेचे पाणी टँकर विकले जात आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या संदर्भात नगर परिषद गटनेते बालूभाऊ मोरे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच वाढला असून, “मौन म्हणजे आरोप मान्य?” अशी चर्चा प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात सुरू आहे. संबंधित आरोपांनुसार, सर्वसामान्य नागरिकांना पाणी न देता पैसे देणाऱ्यांना टँकर पुरवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर काही माजी व पराभूत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नागरिकांच्या शंकांना अधिकच खतपाणी मिळत आहे. आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणार का? आणि दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.1
- नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम? #news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by कु सुषमा डबराल1
- कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी रोडवर एक तासापासून ट्राफिक जाम; नागरिकांचा वैताग नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) उत्तर नागपुरातील कांजी हाऊस चौक ते चुनाभट्टी भिलगाव कडे जाणारा रस्ता तर पारडी ते शारदा चोककडे जाणारा रस्ता असे चारही बाजूनी किमान दोन किलोमिटर पर्यंत रांगाच रांगा लागल्याचे चित्र आहे. ट्राफिक जाम का झाली व कशी झाली याचा विचारणा करत नागरिक एक मेकांना मागील एक तासापासून विचारत आहेत. वाहतूक पोलिस नियंत्रक तर सावलीला दिसत नाहीत. अक्षरशा चक्का जाम झाला आहे.1
- पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.” यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1