Shuru
Apke Nagar Ki App…
मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.2
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदिर प्रतिष्ठान बापू मार्केटच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई देवतांची शहरातून भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला, पुरुष, लहान मुले-मुली आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्माई देवतांची पूजा करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष, माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य रमेश कंतेवार आणि इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले होते. या शोभायात्रेत आमदार जितेश अंतापूरकर, लक्ष्मीकांत पद्ममवार, नगरसेवक अनिल बोनलावार, श्रीधर दीक्षित, वैजनाथ स्वामी, अशोक साखरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे विजय मोर्चा काढण्यात आला. हा विजय मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.1
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- विभागीय आयुक्त झाल्यानंतर नांदेडमध्ये पहिला दौरा करण्यात आला असून, या वेळी विविध विषयांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पाऊस, कर्ज, कर्जमाफी आणि पेरणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी, बीडीओ, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे.2
- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.2