Shuru
Apke Nagar Ki App…
कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटला जातोय… अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता येथील घटना
Sahyadricha rakhandar
कळी उमलण्यापूर्वीच गळा घोटला जातोय… अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता येथील घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sahyadricha rakhandar1
- शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन1
- बल्लारपूरमध्ये भीषण दुर्घटना : झोपडीवर भरधाव चारचाकीची धडक, मध्यप्रदेशातील मजुराचा जागीच मृत्यू बल्लारपूर प्रतिनिधी : बल्लारपूर तालुक्यातील कारवा मार्गावरील जुनोना डेपो परिसरात मध्यरात्री भीषण अपघात घडला. झोपडीत झोपलेल्या मध्यप्रदेशातील बांबू कटाई मजुरांवर भरधाव चारचाकी वाहन घुसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यातील तब्बल २४ मजूर पोंभुर्णा परिसरात बांबू कटाईच्या कामासाठी आले होते. ठेकेदार आनंद धुर्वे यांनी या मजुरांना कामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणले होते. पोंभुर्णा येथील काम पूर्ण झाल्यानंतर मजुरांनी ठेकेदाराकडे मेहनताना मागितला. मात्र, “आज पेमेंट होणार नाही, दोन दिवस थांबा,” असे सांगून सर्व मजुरांना कारवा रोडवरील जुनोना डेपो येथे थांबविण्यात आले. ठेकेदाराने चारचाकी वाहनातून सर्व मजुरांना डेपो परिसरात सोडले. रात्री जेवण करून सर्व मजूर डेपोमधील झोपडीजवळ झोपले होते. दरम्यान, २ मे रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास भरधाव आणि अनियंत्रित MH 49 CS 6844 क्रमांकाचे चारचाकी वाहन थेट झोपडीवर जाऊन धडकले. अचानक झालेल्या या धडकेमुळे झोपलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व मजूर जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे झोपडीची भिंत कोसळली. भिंतीलगत झोपलेले देवलाल शामलाल पंधरे (वय ५५, रा. चारगाव, जि. मंडला, मध्यप्रदेश) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी फरार वाहन चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ठेकेदारांच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.1
- Post by सुबोध पासवान4
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.1
- शेतात नेहमी प्रमाणे कामासाठी गेलेल्या शेतक-याचा विहिरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या येवती शेतशिवारात ही घटना घडली. पांडुरंग चौरीवार असं मृतकांच नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीसांनी सुरु केला आहे.1
- जागतिक कामगार दिनानिमित्त वरोऱ्यात शेकडो कामगारांचा सन्मान; हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा इशारा1