Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्ली पुलीस - गृह मंत्रालय के अंदर RAF - गृहमंत्रालय के अंदर; LOP राहुल गांधी दिल्ली पुलीस - गृह मंत्रालय के अंदर RAF - गृहमंत्रालय के अंदर; LOP राहुल गांधी
SATISH BHALERAO
दिल्ली पुलीस - गृह मंत्रालय के अंदर RAF - गृहमंत्रालय के अंदर; LOP राहुल गांधी दिल्ली पुलीस - गृह मंत्रालय के अंदर RAF - गृहमंत्रालय के अंदर; LOP राहुल गांधी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप उमरेडमध्ये 'Veru Foods' ची दमदार सुरुवात; योगिता बारपात्रे यांच्या जिद्दीला यशाची नवी झेप नागपूर/उमरेड: शहरातील गृहिणी ते यशस्वी उद्योजिका! योगिता बारपात्रे यांच्या 'Veru Foods' चे दिमाखात उद्घाटन1
- शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण घवघवे यांचा आरोप; मुरुम माफियांवर हिंगणा तहसील प्रशासनाचा आशीर्वाद1
- जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश1
- खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.1
- जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा हिंगणघाट तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.1
- जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.1
- सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात सतीश भालेराव नागपूर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.2
- जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश1
- विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.1