तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जावळीच्या खोऱ्यात आणि कोयना नदीच्या पात्राने वेढलेल्या या भागाला जोडण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आली असून, रस्ते मार्ग आणि व्ह्यूइंग गॅलरी अशी त्याची रचना असणार आहे. या केबल स्टेड पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरीही व्ह्यूइंग गॅलरीचे काम पूर्ण व्हायला अजून काही महिने लागणार आहेत. त्यामुळे दिवाळी दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. तापोळा ते अहिर दरम्यानचा हा पूल तयार झाल्यावर #कोकण आणि #पश्चिम_महाराष्ट्र एकमेकांना जोडला जाणार आहे. तसेच या भागातील लोकांचा ४५ किलोमीटरचा वळसा वाचणार असून येणे जाणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात हा भाग उर्वरित महाराष्ट्रापासून तुटणार नाही. तसेच याठिकाणी तयार करण्यात आलेल्या मुनावळे बोटिंग क्लब, मुनावळे ते वासोटा किल्ला या दरम्यान होणारा रोप वे आणि इतर सोयीमुळे जास्तीत जास्त पर्यटक इथे येऊ शकतील असेही याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अभियंते, स्थानिक #शिवसेना पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. रिपोर्टर.अरबाज शेख
तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची आज शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जावळीच्या खोऱ्यात आणि कोयना नदीच्या पात्राने वेढलेल्या या भागाला
जोडण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आली असून, रस्ते मार्ग आणि व्ह्यूइंग गॅलरी अशी त्याची रचना असणार आहे. या केबल स्टेड पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरीही व्ह्यूइंग गॅलरीचे काम पूर्ण व्हायला अजून काही महिने लागणार आहेत. त्यामुळे दिवाळी दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. तापोळा ते अहिर दरम्यानचा हा पूल तयार झाल्यावर #कोकण आणि #पश्चिम_महाराष्ट्र एकमेकांना जोडला जाणार आहे. तसेच या भागातील
लोकांचा ४५ किलोमीटरचा वळसा वाचणार असून येणे जाणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात हा भाग उर्वरित महाराष्ट्रापासून तुटणार नाही. तसेच याठिकाणी तयार करण्यात आलेल्या मुनावळे बोटिंग क्लब, मुनावळे ते वासोटा किल्ला या दरम्यान होणारा रोप वे आणि इतर सोयीमुळे जास्तीत जास्त पर्यटक इथे येऊ शकतील असेही याप्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अभियंते, स्थानिक #शिवसेना पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. रिपोर्टर.अरबाज शेख
- छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.1
- महाराष्ट्रामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होईल.1
- नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात भर लग्नसमारंभात मंडपाला भीषण आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे मंडप विजेच्या तारांवर अडकून शॉर्टसर्किट झाल्याने लाखोंचे नुकसान झाले, ज्यात दुचाकीही जळाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर प्रशासनाला बदनाम करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत समोर आले की व्हिडिओतील महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी होती आणि तिचा गैरवापर करण्यात आला.2