logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची हत्या; आई व प्रियकर अटकेत... पिंपरी चिंचवड :- प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असल्याच्या कारणावरून स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलाचा क्रूरपणे खून करणाऱ्या आईच्या प्रियकराला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आंध्रप्रदेशातून अटक केली आहे. राम विनायक कजेवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी मृत मुलाची आई बसरिन शेख हिला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत... आरोपी बसरिन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेमसंबंध होते. बसरिनला तीन मुले असून ती चार महिन्यांपूर्वी आपला ६ वर्षांचा मुलगा आवेजसह आरोपी रामसोबत कुरुळी ता. खेड येथे राहण्यास आली होती. मात्र, आवेज त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री आरोपींनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवून आणि भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्यासाठी आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा बनाव रचला. पुरावा नष्ट करण्यासाठी ते मृतदेह कारमधून बीड जिल्ह्यात घेऊन गेले. मात्र, मृत मुलाच्या अंगावरील जखमा पाहून फिर्यादी इसाक शेख यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी बसरिनला अटक केली, मात्र राम कजेवाड फरार झाला होता. तपास पथकाने आरोपीचा तिरुपती आंध्रप्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे... : विजय धुमाळ ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक , दक्षिण म्हाळुंगे) #पिंपरीचिंचवड #बालहत्या #गुन्हेवार्ता #क्रूरकृत्य #आईप्रियकर #पोलीसकारवाई #हत्या #न्याय #अपराध #मुलांवरीलअत्याचार #PimpriChinchwad #ChildMurder #CrimeNews #BrutalCrime #MotherAndLover #PoliceAction #MurderCase #Justice #CrimeUpdate

4 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    1
    मावळ पुणे :-
लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे...
#अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती
#AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    36 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
    1
    प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.19
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत  मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे.  एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत  शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ  यांनी मानले.
    4
    शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत  मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे.  एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत  शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला.
प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ  यांनी मानले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मावळ पुणे :- मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे... #अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम #AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent
    1
    मावळ पुणे :-
मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे...
#अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम
#AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    39 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.