logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता --- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण -- शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे. सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ : सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा --- शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.

23 hrs ago
user_सुरेश जगन्नाथ पाटील.
सुरेश जगन्नाथ पाटील.
यावल, जळगाव, महाराष्ट्र•
23 hrs ago

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता --- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण -- शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे. सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ : सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा --- शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता --- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण -- शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे. सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ : सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा --- शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू
यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) 
यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे.
आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता ---
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.
शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण --
शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे.
सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ :
सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे.
तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा ---
शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_सुरेश जगन्नाथ पाटील.
    सुरेश जगन्नाथ पाटील.
    यावल, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दिग्गज अभिनेता नाना पाटेकर नहीं रहे, 75 साल की उम्र में निधन
    1
    दिग्गज अभिनेता नाना पाटेकर नहीं रहे, 75 साल की उम्र में निधन
    user_सच के साथब्रेकिंग न्यूज़ 24
    सच के साथब्रेकिंग न्यूज़ 24
    जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
    1
    SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात...
SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात...
जळगाव जामोद (प्रतिनिधी) : 
SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
    1
    सिल्लोड शहरांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सिल्लोड तहसीलदार यांना दिले निवेदन
कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठे संख्येने पक्षांचे पद अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी सिल्लोड तहसीलदार सागर वाघमारे यांना सदरील निवेदन देण्यात आले
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    35 min ago
  • सिल्लोड में SIR प्रक्रिया के खिलाफ CPI का बड़ा 'घेराव डालो' आंदोलन! तहसीलदार को सौंपा ज्ञापन | AQS NEWS ​#SillodNews #AQSNews #ChhatrapatiSambhajinagar #AurangabadNews #CPI #Sillod #GheraoDalo #FarmersProtest
    1
    सिल्लोड में SIR प्रक्रिया के खिलाफ CPI का बड़ा 'घेराव डालो' आंदोलन! तहसीलदार को सौंपा ज्ञापन | AQS NEWS
​#SillodNews #AQSNews #ChhatrapatiSambhajinagar #AurangabadNews #CPI #Sillod #GheraoDalo #FarmersProtest
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    23 hrs ago
  • बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.​या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
    3
    बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!


खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.​या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 10 अक्टूबर को लेकर CJP की बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस! प्रेस क्लब ऑफ इंडिया में अहम ऐलान
    1
    10 अक्टूबर को लेकर CJP की बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस! प्रेस क्लब ऑफ इंडिया में अहम ऐलान
    user_सच के साथब्रेकिंग न्यूज़ 24
    सच के साथब्रेकिंग न्यूज़ 24
    जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.