दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान महिला आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ चिपळूण शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गोवळकोट रोड येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान महिला व विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर थांबवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत वक्त्यांनी अशा घटनांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. या निषेध मोर्चाचे आयोजन चिपळूण काँग्रेस गटनेते साजिद सरगुरोह यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली.
दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान महिला आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ चिपळूण शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गोवळकोट रोड येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान महिला व विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर थांबवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत वक्त्यांनी अशा घटनांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. या निषेध मोर्चाचे आयोजन चिपळूण काँग्रेस गटनेते साजिद सरगुरोह यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली.
- दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान महिला आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ चिपळूण शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गोवळकोट रोड येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान महिला व विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर थांबवावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत वक्त्यांनी अशा घटनांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. या निषेध मोर्चाचे आयोजन चिपळूण काँग्रेस गटनेते साजिद सरगुरोह यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली.1
- फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.1
- पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.1
- एका व्यक्तीने मेडिकल शॉपमध्ये जाऊन साहित्य घेतले आणि त्याचे पैसे न देता तिथून पोबारा केला. या व्यक्तीने काल दिवसभरात अशाच प्रकारे एकूण ५ मेडिकल दुकानांना गंडा घातला आहे.1
- आंदोलनाचा दणका बसताच अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला असून प्रशासनाने २४ तासांच्या आत तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थी तीव्र आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन शांततामय मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.1
- सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख महेंद्र चंडाळे हे आपला वाढदिवस साजरा न करता विविध उपक्रमांद्वारे तो साजरा करणार आहेत. सांगली शहर आणि जिल्ह्याला आधार देणाऱ्या कृष्णा नदीची स्वच्छता करणे आणि मूर्तींची स्वच्छता करणे, असे विविध उपक्रम या निमित्ताने राबवले जाणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे.1
- भोर तालुक्यातील केंजळ येथे मूळचे रहिवासी व भोलावडे येथील माजी मुख्याध्यापक सुनील शंकराव चोरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वर्गीय आजोबा विठ्ठलराव लक्ष्मण चोरगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नीतिमूल्य, माणुसकी आणि सामाजिक जाणीव दृढ व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ व काळेवाडी तसेच गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत लेखक राजीव केळकर लिखित 'माणुसकीच्या वाटेवर' या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लेखक राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाचन संस्कृती, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. केंद्रप्रमुख मल्हारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय भेलके, माजी सैनिक आनंदराव जाधव, शांताराम भालेघरे, मुख्याध्यापक सुदाम ओंबळे, जे. के. पाटील, धनंजय भिलारे, राजेंद्र बांदल, शशिकांत गुरव, संगीता बोरगे, रत्नप्रभा डाळ, प्रिया नांदे, विनोद जाधव, सुरेश सुतार, चोरगे कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चोरगे यांनी केले, सूत्रसंचालन जे. के. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुदाम ओंबळे यांनी आभार मानले.1