Shuru
Apke Nagar Ki App…
नई जिंदगी के नगरसेवक कहा गये.. हमारे को पानी नही आ रहा.. नई जिंदगी येथील संताप्त महिला..!
Solapur News
नई जिंदगी के नगरसेवक कहा गये.. हमारे को पानी नही आ रहा.. नई जिंदगी येथील संताप्त महिला..!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Solapur News1
- मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नाही कारखान्याला ऊस नेल्यापासून 14 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना ऊस बिल देणे बंधनकारक असतानाही दिले नाही. बँकांचे हप्ते गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मार्च एंड चा आर्थिक फटका सहन करावा लागला. साखर कारखान्याने त्वरित ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यासमूर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे.1
- Post by Vijay Meher1
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत संघटन मजबुती व सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर AICC निरीक्षक देवासिश पटनाईक, प्रदेश निरीक्षक मोहन जोशी, यशराज पारखी, भाऊसाहेब आसबे तसेच प्रदेश सरचिटणीस दिनेश नवगीरे यांच्या उपस्थितीत शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधण्यात आला.यावेळी सर्व निरीक्षकांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले.या संवाद उपक्रमात कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ चर्चा करून त्यांच्या भावना, अनुभव आणि सूचनांची थेट नोंद घेण्यात आली. संघटनेची मजबुती, पारदर्शकता आणि कार्यकर्ता-आधारित निवड प्रक्रिया हे मुख्य मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक रचना अधिक प्रभावी, सक्रिय आणि सर्वसमावेशक करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा सहभाग, संवाद आणि समन्वय यांवर आधारित सक्षम व सशक्त संघटन उभारणीची गरज अधोरेखित करण्यात आली. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर आपले विचार मांडत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत सोलापूर शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेला नवी दिशा मिळत असून, कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच नेतृत्वाची निवड केली जाणार असल्याचे AICC निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी स्पष्ट केले. देवाशीष पटनायक म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असून पक्षाची दिशा ही जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची आहे. यापुढे शहर व जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची निवड ही आता दिल्लीतील वातानुकूलित दालनात न होता थेट कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ आणि महिला, तरुणांशी संवाद साधून केली जाणार आहे. एकाच पदासाठी इच्छुक असलेल्या इतरांना संघटनेत अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. तसेच ब्लॉक आणि फ्रंटल संघटनांच्या निवडीही याच पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- Post by Dr krishna karade1
- बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून यामध्ये लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले असून लोकशाहीत निवडणूक बिनविरोध होणे हे घातक असून निवडणुका लढले पाहिजे व संविधान व लोकशाहीचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले #Lakshmanhake #election #Baramati #politics #Pawar1
- JAY PAWAR JANTA DARBAR : अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.. निमित्त होतं राष्ट्रवादी भवनात जय पवार यांच्या नागरीकांशी गाठीभेटीचं.. आज जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजनाही सुचवल्या.. या निमित्तानं बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली नसेल तरच नवल..1
- श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.1