Shuru
Apke Nagar Ki App…
मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.
Mahadev pakhare super
मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.1
- सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.2
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो1
- मेंढपाळांची शासनाकडून होत आहे फसवणूक असे बंडू महानर यांचे वक्तव्य गेली अनेक दिवसापासून मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे मेंढपाळाना वारंवार संकटामध्ये सापडत आहे मात्र शासनाकडून फक्त आश्वासनच दिल्या जात आहे1
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- शहागडमध्ये पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ:सर्वत्र भीतीचे वातावरण अंबड तालुक्यातील शहागड येथे गावात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शाळकरी विद्यार्थ्यांसह ५ ते ७ जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने श्वान पथक पाचारण करून पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.1