Shuru
Apke Nagar Ki App…
औसा तालुक्यातील एरंडी गावात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले वय 25 वर्ष उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
द महाराष्ट्र न्युज
औसा तालुक्यातील एरंडी गावात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले वय 25 वर्ष उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवा; संघटन अधिक बळकट करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *महिला नगरसेविका व पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यक्रमाच्या मालिकेचे डॅा.नीलम गोऱ्हे तर्फे नियोजन* मुंबई, दि. २७ : शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तळागाळातील गरजू महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदत मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय राहून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच, कार्य करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे निवारण करण्याची पद्धत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’अंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, महिला संघटन अधिक बळकट करून विभागातील सामाजिक कार्यांना गती देण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली. कार्यशाळेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत श्री. रामहरी राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोफत आरोग्य सेवा, कॅशलेस योजना तसेच महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली. यासोबतच, या योजनांमध्ये कुठलीही अडचण आल्यास ओम पालकर (८६५७०६१५१५), रवी ननावरे (८९०७७७६५५०) आणि रामहरी राऊत (८९०७७७६००४) या क्रमांकांवर संपर्क साधून शिवसेनेतर्फे मदत व माहिती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये वेळ न मिळाल्यास रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष समन्वय व्यवस्था उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत श्री. शेखर परदेशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एस.आय.आर. म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन असून, BLO मार्फत केलेल्या पडताळणीद्वारे मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त ठेवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ECI NET ॲपविषयीही माहिती दिली. या कार्यशाळेला शिवसेना उपनेत्या कला शिंदे, सुशीबेन शहा, कांदिवलीच्या नगरसेविका दीक्षा कारकर, ॲडव्होकेट संगीता चव्हाण (महिला संपर्कप्रमुख, बीड-धाराशिव), बोरिवलीच्या नगरसेविका संध्या दोषी, चाकणच्या नगराध्यक्ष, अंधेरी पश्चिमच्या माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच मागाठाणे विभाग प्रमुख मीना पानमंद उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. याशिवाय बीड, सांगली जिल्ह्यांसह विविध ठिकाणांतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच मुंबईतील विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख आणि महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता मोरे (संपर्कप्रमुख, सांगली) यांनी केले. ही कार्यशाळा महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरली असून, जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केला.1
- औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले वय 25 वर्ष उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1
- लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.1
- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...1
- Post by नागनाथ ससाने1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश1
- मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड1